नमस्कार शेतकरी मित्रांनो, केशरनंदन अॅग्रो या शेती  ब्लॉगवर आपल्या सर्वांच स्वागत..!

        महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण कृषि उद्योजक बनला पाहिजे ही आमची सार्थ इच्छा आहे. त्यामुळे आम्ही यूट्यूब, फेसबुक. व्हाटसअप् यांसारख्या समाजमाध्यमातून आजच्या तरुणाईला आवडेल आणि समजेल आशा पद्धतीने कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहोत. आज आपण भाजीपाला या समुद्रा एवढ्या सेक्टरमधील दोडका या पिकाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. 

        दोडका ही भाजीपाला वर्गातील चांगला ऑप्शन आहे, महाराष्ट्रभर छोट्यामोठ्या सर्व मार्केटमध्ये दोडक्याला वर्षभर मागणी असते. चवदार दोडक्याची सुकी आणि रशाची आशा दोन्ही भाज्या बनतात. त्यामुळे दोडका खणाऱ्यांची चांगली संख्या आहे. 

        दोडक्याच लागवड अंतर भागानुसार सगळीकडे वेगवेगळे आहे. परंतु 5 x 2 फुटावर दोडका चांगला येतो, हेच अंतर थंडीमद्धे कमी पण ठेऊ शकतो. दोन ओळीतील अंतर 5 फुट आणि दोन रोपांमधल अंतर 2 फुट सर्वसाधारणपणे आपण ठेवतो. 

        तारकाठी  नियोजन आणि मंडप नियोजन खूप चांगल पाहिजे. लागवड जेवढी सुटसुटित तेवढ उत्पन्न वाढीसाठी फायदा होणार आहे. दोडक्याचा  मंडप करताना प्लॉट ची लांबी रुंदी लक्षात घेऊन त्यापद्धतीने नियोजन करणे खूप गरजेच आहे. दोडक्याची जाडी लांबी आकर्षक आहे तेंव्हा जर तोंडणी केली तर मार्केटला चांगला दर मिळतो. 

        आपापल्या मार्केटनुसार जातींची निवड करणे महत्वाचे ठरेल. त्यामध्ये नागा, ध्रुव, नवीन, निर्मल 726, संतोष इ. खूप चांगले उत्पन्न देणारे वान बाजारात उपलब्ध आहेत. दोडक्याच्या जातींची निवड करताना त्या जातीची गुणवैशिष्ट्ये जसे की  उत्पादन, फळांचा आकार, फळांचे वजन, फळाचा रंग, चव आणि काढणीपाश्चात साठवणूक, किडी रोगास सहनशीलता,  मार्केटची डिमांड इ . गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. 

        दोडका पिकावर भुरी, केवडा, फळ सड, मर, वांझ, करपा इ रोग तसेच मावा, पांढरी माशी, तुडतुडे, नागअळी, फळमाशी इ. रससोशक किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. एकात्मिक पीक संरक्षण विषयी अधिक जाणून घेण्यासाठी आजच आमच्या कृषि सेवा केंद्रला भेट द्या. 

        दोडक्याला साधारणपणे 50 हजार रुपये पर्यन्त लागवड खर्च एकरी खर्च येऊ शकतो. परंतु उत्पन्नाचा विचार केला असता खत, पाणी, फवारणी इ. गोष्टींचे व्यवस्थित नियोजन केले तर एकरी 20 टे 25 टनापर्यंत शेतकरी उत्पन्न मिळवू शकतात. आजच्या स्पर्धेच्या युगात नुसत उत्पन्न मिळवण्यापेक्षा त्याची मार्केटिंग सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे काढणी झालेल्या मालाची वर्गवारी, स्वच्छता करून तो व्यवस्थित मार्केट ला पोहचवणे ही पण तेवढीच महत्वाची जबाबदारी आहे.