शेतकरी मित्रांनो नमस्कार 🙏 मी स्वप्नील शिंदे (शेती व रोपवाटिका अभ्यासक) आपणास संबोधित करतो की,
आम्ही गेल्या सात वर्षांपासून भाजीपाला लागवडी व रोपांची निर्मिती करून, अन्नदाता-शेतकरी बांधवांसाठी नवनवीन पिके  व नवीन जातीचे वान त्यांच्या बांधापर्यंत पोहोचवत आहोत...
तसेच शेती क्षेत्रात येणारी नवीन आव्हाने यांचा अभ्यास करून त्यावर उपाय व अपाय यांचा विचार करून निर्णय देत आहोत...
त्यासाठी आम्हाला अनेक माध्यमांचा वापर करून सुध्दा पुरेशी माहिती देता आली नाही...
परंतु या 'ब्लॉग'  च्या माध्यमातून आम्ही पोचलो आहे तुमच्यासाठी खास नवनवीन पीक पद्धती, त्यांच्या विविध जाती-प्रजाती, लागवडी साठी योग्य वेळी, पीक पद्धती... तसेच नवनवीन प्रयोग करून ते आपल्यासाठी पोहोचवण्यासाठी आम्ही आपणास कटिबद्ध आहोत...
मित्रांनो सध्याचे वातावरण प्रचंड अडचणी घेऊन येत आहे...
त्यासाठी आपला शेतकरी मित्र तोट्यात नाही च गेला पाहिजे...
म्हणून सर्व पूर्वकल्पना व अंदाज आम्ही आपणासमोर मांडणार आहोत...