आज 26 एप्रिल 2023 जागतिक बीज दिवस...

आजचा दिवस त्या जीवासाठी जो जिव स्वतःला जमिनीत गाडून घेतो कोणाचीतरी भूक भागवण्यासाठी...

गोष्ट आहे अश्मयुगीन कालखंडातील-

आपण लहानपणी शिकलो की अश्मयुगीन बायका जंगलात राहत आणि तेथील स्थानिक वातावरनाचा सामना करत आपले जीवन जगत असत.. माणसे मात्र प्राण्यांची शिकार करण्यासाठी बाहेर भटकंती करत.. बायका मात्र फळे गोळा करणे... बिया गोळा करणे यामध्ये आपले कौशल्य पणाला लावत... त्यातून च त्यांना शोध लागला की बियांपासून रोपे व झाडे तयार होत आहेत... मग दिवसेंदिवस त्यांचा आत्मविश्र्वास वाढत जात होता... यातूनच पुढे जाऊन शेतीचा शोध लागला... म्हणून अश्मयुगीन बायका खर्या बिया व शेतीच्या पहिल्या जनक मानल्या गेल्या...

त्यांचा लौकिक म्हणून दरवर्षी हिंदू धर्मामध्ये घटस्थापना सन साजरा होऊ लागला.. त्यात त्यांना सिंहाचा वाटा म्हणून बीज पेरणी पासून, नऊ दिवस त्याचे संगोपन व पूजा करण्याचा अधिकार त्यांना आहे...

असो,

आज रोजी बियाणे क्षेत्रामध्ये काम करत असताना मनाला समाधान वाटते की खरंच क्रांती झाली... आज आपण F1 च्या काळात आहोत.. आज भारतामध्ये 240 कंपन्या बियाण्यामध्ये काम करतात... तसेच भारताबाहेरील शेकडो कंपन्या ही भारतात काम करत आहेत...त्याच कारण भारतात 16 वातावरणीय विभाग आहेत. त्यात सर्व ची सर्व पिके चांगल्या अवस्थेत येतात...

 परंतु खंत अशी की अनेक कंपन्या  चांगल्या जाहिराती प्रसिद्ध करणे, निवडक फोटो, तसेच खोटी माहिती देऊन त्या कालावधीत बियाणे विक्री करणे आणि नंतर त्या विभागातून गायब होणे या तक्रारी कृषी विभागाकडे भरपूर येत असतात. हजारो लाखो रुपये खर्च करून सुध्दा पीक हाती येत नाही. कंपन्या मात्र करोडो रुपये गिळंकृत करून मोकळ्या होतात. त्यासाठी बियाणे कायदा 1966 च्या कलम 5 नुसार तरतुदी आहेत.