60SS66 BG II - श्रीकर् जयहो


बॉलगार्ड II


पीकाचा कालावधि: 150-160 दिवस


पहिला फुलोरा: 55-60 दिवस


रोपाचा प्रकार: उंच, स्थिर आणि अधिक फांद्या


बोंडाचे वजन: 5.8-6.0 ग्रॅम


बोडाचा आकार: गोलाकार


 जय हो चे वैशिष्ट्य: 

60SS66 BG || ची रोप चांगल्या उंचीची असतात. 

त्यांची पाने गडद हिरव्या रंगाची असतात.

पानांचा खालील भाग लोकरी (फर) सारखा असतो, ते रसशोषक कीटकांपासून पीकाला वाचविते, त्यामुळे उत्पादनात वाढ होते.


कपाशी पीकाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी टीपस्: 

कपाशी सर्व जगात उत्तम कमर्शियल नगदी पीकाच्या रुपात घेतले जाते. आपल्या देशात ९१.८ लाख हेक्टर शेतात ते लावले जाते. कपाशीचे सिंचन पाऊस अथवा कालवे/ पाटाच्या पाण्याने केली जाते. बॉलगार्ड ॥ कपाशी बियाणे शेतकऱ्यांचा कीटकनाशकाचा खर्च वाचवितो. इतर सुट्या प्रकारच्या बयाण्याच्या तुलनेत हे बीयाणे २५% पीक अधिक देते. बॉलगार्ड || कपाशीच्या बीयाण्याच्या रोपाच्या फांद्याना अधिक बोंडे लागलाने ह्या रोपांना पोषक तत्वांची गरजही अधिक असते. जर पोषक तत्वाचे योग्य प्रमाण मिळाले नाही, तर उत्पादनातही तोटा होतो. म्हणूनच गरजेचे आहे की शेती करण्यापूर्वी तेथील जमिनीच्या मातीची चांचणी घ्यावी आणि रोपांना दिले जाणारे पोषक खत आणि त्याचा प्रमाणाचा विचार करावा.


जमिनीची मशागत : उन्हाळ्यात शेताची खोलवर नांगरणी करावी त्यामुळे कीटक, रोग आणि तणांचा नाश होतो. शिफारस हीच केली -जाते की ज्या शेतात आधि कापूस लावला गेला नसेल त्या शेतातच बीयाणे लावा. त्यामुळे उत्तम उत्पादन मिळते. एका नंतर दुसरे पीक लावल्याने शेताची उर्वरकता बनून राहते आणि रोगही उद्भवत नाही.


रासायनिक व सेंद्रिय खते:

 पेरणी पासून ३-४ आठवड्यापूर्वी, ४-५ टन शेणखत आणि ५० कि.ग्रॅ. रोपणीच्या नंतर, १५ किग्रॅ यूरिया, २५ कि. ग्रॅ. पोटॅश, ५ कि.ग्रॅ. झिंक सल्फेट मिसळून नांगरणीच्या वेळी घालावे.

नोट:

वरती सांगितलेले जैविक खत आणि कीटकनाशकाच्या मिश्रणाने माती सुपिक बनून राहते, रोप स्वस्थ राहतात आणि बऱ्याच रोगांपासून संरक्षण होते.


रासायनिक खत: 

मातीचा प्रकार आणि स्थानिक पध्दतीनुसार खताचे प्रमाण कमी जास्त करावे.


सुक्ष्म पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन: मैग्नेशियमची कमतरता:

 ह्याच्या कमतरतेने पानांचा मध्यभाग हीरवा पिवळा होतो आणि नंतर लाल होतो. मॅग्नेशियम ची कमतरता कळताच, एक लीटर पाण्यात १० ग्रॅम मॅग्नेशियम मिसळा आणि ४०-६० दिवसाचे जूने पीक होताच त्यावर फवारणी करा.

 

झिंकची कमतरता: 

ह्यामधे पानांचा शेवटचा भाग सुकून जातो

आणि परवा खाली वळतो. हयासाठी ५-६ दिवसाच्या अंतराने दोनदा पाण्यात २ ग्रॅम झिंक सल्फेट मिसळून फवारणी करा


बोरॉनची कमतरता:

 रोप वाढत नाही, तर वरील भाग बुटका होतो.. ह्यासाठी १ लिटर पाण्यात १ ते १.५ ग्रॅम बोरॉन मिसळून ५-६ दिवसाच्या अंतराने फवारणी करा. सिंचन उगवण, रोपट्याची वाढ, पाते व बोंडे धरण्याची व विकासित होण्याची अवस्था या पीकाच्या महत्वाच्या अवस्थांमध्ये उपलब्धतेची खात्री करावी. बराच काळ पाणी साठून राहिल्यास कापसावर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे जास्तीच्या पाण्याचा शेतामधून निचरा होईल ह्याची खबरदारी घ्यावी.


रांग ते रांग आणि रोप ते रोपा मधिल अंतर :


काळी मार्ती: १२०X९० सेमी 

हलकी माती १००X९० सेमी


रसशोषक कीटक

 मावा: नुकसान मावा कोवळ्या फळांचा आणि पानांचा खालील भाग शोषून घेतात. अशी पाने सुकून जातात पानांवर चिकट स्त्राव जमा होतो आणि ते धुरकट दिसू लागतात. 

नियंत्रण: पानांच्या खालील भागावर १ लीटर पाण्यात ०.२५ मिली इमिडाक्लोप्रिड(ॲडमित) मिसळून फवारा


पांढरी माशी:

निम्फ आणि प्रौढ कीटक पानाच्या खालील भागातून रस शोषून घेतात, त्यामुळे पानांतील पोषक तत्व संपून जातात. वाढ खुंटते. कपाशीची बोंडे काळी होवू लागतात. उत्पादनात कमी येते. नियंत्रण एक लीटर पाण्यात १.३ मि.ली. ट्रायजोफॉस (होस्टाथिऑन ) मिसळून फवारले पाहिजे. 

तुडतुडे: पानांच्या खालील भागातून निंफ आणि माहीतही पडत नाही. पाने सुरकूतल्या सारखी होवून लालसर पिवळी होवून सुकून जातात. ह्याला टोळांचा दाह म्हणतात नंतर पाने गळून पडतात नियंत्रण: एक लीटर पाण्यात ०.२५ मि.ली. इमिडाक्लोप्रिड मिसळून फवारा

जेणे करु रोप ओलेचिंब होईल.

फुलकिडे: हे फुलकिडे रोपाच्या कोवळ्या भागातील रस शोषून घेतात. जेव्हा पाने नाजूक असतात आणि कोवळी असतात, तेव्हा ते हल्ला करतात. त्यामुळे पाने लालसर होवू लागतात मोठ्या प्रमाणात हल्ला झाल्यास पाने सुरकूतल्या सारखी होवून, सुकू लागतात आणि गळू लागतात. नियंत्रण: एक लीटर पाण्यात एडमायर (इमिडाक्लोप्रिड) मिसळून व्यवस्थित फवारणी करा.  

कोळी: निम्फ आणि प्रौढ कीटक समूहाने पानांच्या खाली जमा होतात आणि पानांतील रस शोषून घेतात. अशी पाने लाल होवून, गळू लागतात. 

नियंत्रण: एक लिटर पाण्यात २ग्रॅम इसावित+ २ मिली मेटीगेट मिसळून पानांच्या खालील भागावर फवारणी करा.


रोग 


कपाशी च्या पीकावर जेव्हा भूरी रोगाचा हल्ला होतो, तेव्हा इसावीत २.२५ ग्रॅम आणि अरेस्ट व डॉमार्क ला १ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. अशा प्रकारे बॅक्टेरियल करपा चा हल्ला झाल्यास, एक लीटर पाण्यात २ ते २.५ ग्रॅम रेझ आणि ०.१ ग्रॅम सेप्टोसाइक्लिन किंवा १.५ ग्रॅम मॅट्रिक्स आणि १.५ मिली डायजिन मिसळून फवारणी केली पाहिजे,


पानांच्या करपा रोगाला बायोगार्ड सारख्या. कीटकनाशकाचे ४ ग्रॅम (ट्रायोडर्मा विरडा) जैविक फवारणी नेही नियंत्रित करु शकता १ किलो बियाण्याचा उपचार हयानी करावाः आर्थिक नुकसानाच टप्पा दिसताच, या उत्पादनाचा वापर करा.


इ.टी.एल (इकॉनॉमिक थ्रेशहोल्ड लेवल) नुकसान करण्याचा टप्पा -


मावा: १०% झाडे प्रभावित झाल्यावर


पांढरी माशी: ८-१० किडी प्रति पानांवर आढळल्यास


तुडेतुड़े: २ पिल्ले प्रति पानावर आढळल्यास


फुलकिडे:८-१०% झाडे प्रभावित झाल्यावर


लालकोळी: १०% झाडे प्रभावित झाल्यावर


बोंडे पोखरणाऱ्या अळ्या: एक किड प्रति पान


पर्यावरण संरक्षण कायदा व त्याच्या अंतर्गत असणारे • नियम यानुसार, जेनेटिक इंजिनीअरिंग अॅप्रुव्हल कमिटी (जीईएसी) मध्ये घालून देण्यात आलेल्या शर्तीनुसार, बोंडअळीच्या प्रतिरोधाला अटकाव करण्यासाठी आरआयबी (रेफ्युज इन बॅग) आणि व्यवस्थापन कार्यपद्धतींचा हेतू बीटी बियाण्यांसह मिश्र करण्यात आलेल्या 5-10% नॉन-बीटी बियाण्यांसह बिग बॉस बीजी | कॉटन हे रेफ्युज इन बॅग (451.25 ग्रॅम्स बीटी बियाणे + 23.75 ग्रॅम्स (5%)). म्हणून ओळखले जाते. नॉन-बीटी, जे कापसाचे स्वरूप (पॅटर्न) आणि कापसाच्या तंतूंची लांबी यांमध्ये बीटी बियाण्यांसारखे असते. रेफ्युज असणाऱ्या समान बॅगेमुळे थोडी हानी होऊ शकते परंतु ते बोंडअळीच्या प्रतिरोधाला अटकाव करेल. जेणेकरून शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ प्राप्त होऊ शकेल, आरआयबीः किमान 5% नॉन-बीटी बियाणे मिसळलेले 475 ग्रॅम्स बीटी बियाण्यांचे पॅकेट.