नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन लागवड विषयी माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण उत्पाद्कता वाढवण्याचे उपाय , सुधारित वाण, जमीन, हवामान, सोयाबीन पीकसाठी जमिनीची पूर्वमशागत कशी करावी, सोयाबीनची पेरणी कधी आणि कशी करावी, खत व्यवस्थापन, आंतरमशागत इत्यादी गोष्टींची माहिती पाहणार आहोत.

सोयाबीन हे कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते. सोयाबीन प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाणारे पीक आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणूनही ओळखले जाते. सोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे प्रामुख्याने सोयाबीनची शेती जास्त प्रमाणात केली जाते. एकूण प्रथिनांपैकीं ६० टक्के प्रथिने सोयाबीनपासून तयार होतात.

सोयाबीन पिकाचा घेतल्यानंतरच राहिलेला उर्वरित भाग हा जनावरांसाठी पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो. सोयाबीनपासून बिस्कीट , सोया पावडर, सोयावडीसारखे १०० उपपदार्थ तयार करता येतात . त्याचा पालापाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. सोयाबीनला हे पीक फायदा देणार आहे.

•    सोयाबीनची उत्पाद्कता वाढवण्याचे उपाय –
१)बीजप्रक्रिया करणे.
२)सुधारीत जातींची बियाणे वापरावीत.
३)योग्य  खताचा वापर करणे.
४)आधुनिक पेरणी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा.
५)आंतरपीक पद्धतींचा वापर करणे.
६)कीड व रोगांचा आणि तण यांवर वेळेवर बंदोबस्त करणे.


*सोयाबीन नवीन जाती –
फुले संगम , फुले किमया ,  फुले दुर्वा, JS-३३५,


जमीन
१)सोयाबीनच्या लागवडीसाठी चांगला निचरा होणारी.
 २) सोयाबीन पिकासाठी मध्यम ते भारी, गाळाची जमीन उत्तम ठरते.
३) पाण्याचा चांगला निचरा होणारी, आम्ल-विम्ल निर्देशांक ६.५ ते ७.५ पर्यंत असणारी मध्यम प्रतीची जमीन योग्य आहे. 
४) भारी जमिनीत झाडांची शाखीय वाढ जास्त प्रमाणात होते.


"हवामान
१)सोयाबीन पिकास उष्ण हवामान आणि तापमान साधारणतः 
२) सोयाबीन पीक समशीतोष्ण हवामानात उत्तम येते. २५ ते ३५ ० सेल्सिअस तापमान योग्य आहे
 ३)सोयाबीन पिकास  ८०० ते १००० मी.मी. पावसाची गरज असते.

                 *लागवड व्यवस्थापन

१) सोयाबीन पिकासाठी पेरणीपूर्वी जमीन खोल नांगरुन चांगली भुसभुशीत करावी.
२) काकर्या पाळी घालून एक साईड ला थोडा धाल द्यावा
 ३) सोयाबीन पिकासाठी चांगलं कुजून गेलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ ते ३० गाड्या वापराव्या .

*सोयाबीनची पेरणी कधी आणि कशी करावी?
१)सोयाबीन पिकाची ८ जून ते २५ जुले च्या दरम्यान पेरणी करावी. 
२)सोयाबीन पिकाची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे असते. 
३) सोयाबीन पिकाची पेरणी नेहमी बैल जोडी किंवा छोट्या टॅक्टर ने करावी 

*पिकातील अंतर 
१)सोयाबीन बियाणे ५० x ५ सें.मी. अंतरावर पेरावे. 
२)पेरणी करताना बियाणे ३ ते ५ सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही, हि काळजी घेऊन पेरणी करावी. 
३) सोयाबीन बियाणांची उगवण झाल्यावर गरजेनुसार पाणी द्यावे.

*सोयाबीनमध्ये आंतरपीक पद्धती.
सोयाबीन पिकामध्ये ३प्रकारे आंतरपीक पद्धतीचा वापर करू शकतो. त्या पद्धती खालीलप्रमाणे असणार आहेत.

१)सोयाबीन आणि तूर 
२)सोयाबीन आणि कपाशी 
३)सोयाबीन आणि ज्वारी 

*सोयाबीन खत व्यवस्थापन
        सोयाबीन पिकासाठी एकरी 12 किलो नत्र व 30 किलो स्फुरद वापरण्याची शिफारस आहे. म्हणजेच डीएपी एकरी 60 ते 70 किलो दिल्यास शिफारशीत मात्रा दिली जाते. काही ठिकाणी सुपर फॉस्फेट पेरणी पूर्वी वापरतात. हे चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे आहे.
ज्या जमिनीमध्ये पालाशचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी 12:32:16 किंवा 14:35:14 ही खते सुद्धा उपयुक्त ठरतात. सोयाबीनला खताची मात्रा पेरतानाच द्यावी, दुसऱ्या पिकांप्रमाणे नंतर नत्राची दुसरी मात्रा देऊ नये.
त्याचप्रमाणे सोयाबीनला एकरी दहा किलो सल्फर दाणेदार किंवा एक किलो सल्फर WDG + पाच किलो ह्युमिक ऍसिड दाणेदार जसे रायझर-जी किंवा ह्यूमॉल किंवा ह्युमिसील पेरणी बरोबर दिल्यास चांगला फायदा होतो
 
*सोयाबीन आंतरमशागत –
१) सोयाबीन पेरणीनंतर २०-३० दिवसांनी तन नाशकाची एक फवारणी करावी . उ.दा. पटेला -२ मिली/लि, 
२) सोयाबीन पिकासाठी ५० दिवसांनंतर  कोळपणी द्यावी. त्याचबरोबर गरजेनुसार खुरपण्या देऊन पीकातील तण काढून घ्यावे. सोयाबीनमधील तणांवर  नियंत्रित ठेवावे.

*रोग व कीड नियंत्रण 
   रोग नियंत्रण

 बीजप्रक्रियेसाठी शिफारस केलेली बुरशीनाशके
1. बियाणे व रोपकूज
बुरशीनाशक-   पेनफ्ल्युफेन १३.२८ टक्के अधिक ट्रायफ्लोक्झीस्ट्रॉबीन १३.२८ टक्के एफएस- मात्रा- प्रति किलो बियाणे- ८ ते १० मिली 

2. अल्टरनेरिया 
पानावरील ठिपके, बेडकाच्या डोळ्यासारखे पानावरील ठिपके

बुरशीनाशके मात्रा प्रति १० लीटर पाणी
पायरॅक्लोस्ट्रोबीन २० डब्ल्यूजी ७-१० ग्रॅम
पिकॉक्सीस्ट्रॉबीन २२.५२ टक्के एससी ८ मिली
फ़्ल्युक्झॅपायरॉक्झॅड १६७ ग्रॅम प्रति लि. अधिक पायरॅक्लोस्ट्रॉबीन ३३३ ग्रॅम प्रति लि. एससी ६ मिली

3. शेंगांवरील करपा

टेब्युकोनॅझोल २५.९ टक्के इसी १२.५ ते १५ मिली
टेब्युकोनॅझोल १० डब्ल्यूपी अधिक सल्फर ६५ डब्ल्यूजी २५ ग्रॅम

  *कीड नियंत्रण* 

1. तंबाखुवरील पाने खाणारी अळी 

हि बहुभाक्षीय किड असून ती उडीद, सोयाबीन, कापूस, टमाटे, तंबाखू, एरंडी, मिरची, कांदा, हरभरा, मका इत्यादी पिकांमध्ये आढळून येते.  मादी पतंगाने घातलेल्या एका अंडीपुंज्यामध्ये साधारणतः 80 ते 100 अंडी असतात. अंडीपुंज्यातून बाहेर पडल्यावर हि अळी फिकट हिरवी आणी थोडीशी पारदर्शक असते. या अळीच्या कोशावास्थेपर्यंत जान्या अगोदर 5-6 अवस्था होतात.
पहिल्या 2 अवस्थामध्ये ह्या अळ्या समूहामध्ये पानांच्यामागील बाजूस राहून पानातील हरितद्रव्य खातात, त्यामुळे पाने जाळीदार होतात.
तृतीय अवस्थेपासून या अळ्या विलग होऊन स्वतंत्रपणे सोयाबीनची पाने, कोवळी शेंडे, फुले व कोवळ्या शेंगा खातात. परिणामी उत्पादनात लक्षनीय घट येते.
*फवारणी-
निंबोळी अर्क 5 टक्के
क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली प्रति 10 लिटर
एझाडीरॅकटीण (नीम ऑईल) 1500 पी. पी. एम. 25 मिली प्रति 10 लिटर पाणी.

 2. हिरवी उंट अळी 

हि अळी नावाप्रमाणेच हिरवी असून पोटावर कमी असलेल्या पायांमुळे ती उंटाप्रमाणे पाठीस विशिष्ट वाक देऊन किंवा कुबड काढून चालते.
मादीचा पतंग एकाठिकाणी केवळ एकच अंडे घालतो. त्या अंड्यामधून निघालेली अळी प्रथम पानांमधील हरितद्रव्य खाते.
नंतर मोठी झालेली अळी पानांचा पूर्ण भाग खातात त्यामुळे पानांच्या शिराच शिल्लक राहतात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते.
फवारणी #
निंबोळी अर्क 5 टक्के
क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली प्रति 10 लिटर
एझाडीरॅकटीण (नीम ऑईल) 1500 पी. पी. एम. 25 मिली प्रति 10 लिटर पाणी.

 3. पाने गुंडाळणारी अळी 

हि अळी हिरवट रंगाची असून तिचे डोके काळे असते.
अळी सुरुवातीला पाने पोखरून उपजीविका करते.
त्यानंतर आजूबाजूची पाने जोडून त्याच्या सुरळीत राहून जगते.
जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने भुरकट पडून वाळून जातात व झाडांची वाढ खुंटते.
फवारणी @@
फेनवलरेट 20 ईसी 17 मिली प्रति/१० लिटर पाणी

4. केसाळ अळी 

या किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूस पुंजाक्यामध्ये अंडे घालते.
त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पुंजक्याने झाडावर राहून पानातील हरितद्रव्य खात असल्यामुळे पाने जाळीदार होतात.
लहान अळ्या मळकट पिवळ्या तर मोठ्या अळ्या भुरकत लाल रंगाच्या असून शरीरावर नारंगी रंगाचे दाट केस असतात.
फवारणी#
निंबोळी अर्क 5 टक्के
क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली प्रति 10 लिटर
एझाडीरॅकटीण (नीम ऑईल) 1500 पी. पी. एम. 25 मिली प्रति 10 लिटर पाणी.

5. खोडमाशी

या किडीच्या प्रोढ माश्या चकचकीत काळ्या रंगाच्या असतात.
मादी माशी देठावर व पानावर अंडी घालतात.
अंड्यातून बाहेर पडलेल्या पाय नसलेल्या अळ्या पाने पोखरतात आणी त्याद्वारे फांदीत पोखरून आतील भाग पोखरून खातात त्यामुळे झाडाला अन्नद्रव्ये मिळत नाहीत.
अशा झाडांची वाढ खुंटते व ते वाळू लागतात.

6. चक्री भुंगे

प्रौढ भुंग्याचे पंख कळ्या भुरकट रंगाचे असतात त्यामुळे ते सहज ओळखू येतात.
पिकाच्या सुरुवातीच्या काळात मादी भुंगे देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर अंडी घालण्यासाठी दोन समांतर खापा करून त्यामध्ये अंडी घालतात, त्यामुळे अन्नपुरवठा बंद होतो आणी खापाच्या वरचा भाग वाळून जातो.
अळ्या पिवळ्या रंगाच्या असून त्याच्या खालील भागावर उभारट ग्रंथी असतात.
अळ्या देठ, फांदी आणी खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहचतात.  यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.