भरपूर उत्पादन क्षमता : निर्मल संकरीत भेंडी एनओएच - १७५८ (लिसा)🔑लागवडीची सुत्रे

जमीन: मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी हवी. 
बियाणे: संकरीत, २ ते २.५ किलो प्रती एकर
पेरणीतील अंतर: ६० x ३० से. मी.
खते:  जमीन तयार करतेवेळी कंपोस्ट खत २५-३० टन प्रती हेक्टर द्यावे. पेरणी करतेवेळी ९० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ८० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी ९० किलो नत्र द्यावे. 
पाणी व्यवस्थापन: पिकाच्या गरजेनुसार हिवाळ्यात व उन्हाळ्यात ६ -७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पावसाळ्यात योग्य व गरजेनुसार पाणी द्यावे. 

किड व्यवस्थापन: 

मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी: इमिडाक्लोप्रिड ०.५ मिलि प्रती लीटर पाणी

नागअळी: इमामेक्टीन बेंझोएट ०.५ मिलि प्रती लीटर पाणी
 
भुरी: डोमार्क १ मिलि प्रती लीटर किंवा सुमि ताज १ ग्रॅम प्रती लीटर पाणी 

YVM वायरस: पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी वारलोर्ड ०.५ ग्रॅम किंवा टोरपेडो १ मिलि प्रती लीटर किंवा परमीट ०.५ ग्रॅम प्रति लीटर  

विशेष शिफारस: रायजामीका १००- २०० ग्रॅम अधिक बायो-संजीवनी १ किलो प्रती एकर

गुण वैशिष्ट्ये:  

  • पहिली तोंडणी- ४८ ते ५० दिवस 
  • फळाचा रंग- ज्यादा गर्द हिरवा
  • फळांची लांबी- १२ ते १४ सेमी 
  • पिकाचा कालावधी- ११० ते १२० दिवस 

ठळक वैशिष्टे: 
  • ज्यादा गर्द हिरव्या रंगाची लांब फळे 
  • दोन पेरातील अंतर कमी 
  • भरघोस उत्पादन क्षमता
  • ELCV व एलो व्हेन मोझाक वायरस YVMV रोगास सहनशील
  • पाने कातरलेली असल्यामुळे भुरी रोगास सहनशील
टिप: वरील माहिती व जातीचे गुणधर्म कंपनीच्या संशोधन केंद्रावरील निरीक्षणाच्या आधारे दिलेली आहेत, स्थळ, काळ, हवामान व मशागत या नुसार यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 


शेतकरी प्रगती मंच