निर्मल सिड्स प्रा. लि. पाचोरा व केशरनंदन अॅग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने,


संकरीत दोडका NRGH-726

पीक प्रत्यक्ष पाहाणी कार्यक्रम व सन्मान बळीराजाचा
शेतकऱ्यांचे नाव - श्री. - नवनाथ गुळमे (प्रगतशील शेतकरी तथा दोडका उत्पादक)

पत्ता - मु.पो. बारडगाव दगडी ता. कर्जत जिल्हा- अहमदनगर (महाराष्ट्र)


सं. दोडका निर्मल - NRGH-726

लागवड दि. - ०१/०५/२०२३ 

आज दि. १७/०६/२०२३ रोजी सकाळी संपन्न झाला.

पिक पाहणी कार्यक्रमाचे अध्यक्ष केशरनंदन अॅग्रो बारडगाव दगडी संचालक श्री. महेश कदम साहेब होते .

  बारडगाव दगडी या गावी निर्मल सिड्स प्रा.लि. कंपनीचा संकरीत दोडका NRGH-726 पीक पाहणी कार्यक्रम झाला  बारडगाव , तळवडी, बेलवंडी, अळसुंदा, नागलवाडी व राशीन परिसरातील १५० पेक्षा अधिक दोडका उत्पादक शेतकरी वर्ग उपस्थित होता.

  सदर कार्यक्रमा मध्ये मा. श्री राजाराम सुरवसे साहेब (TM श्रीगोंदा ) यांनी शेतकरी बंधू यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून निर्मल सिड्स प्रा. लि.पाचोरा बद्दल माहिती दिली .

  मा. श्री आर. एस. दहातोंडे साहेब (RM अहमदनगर) निर्मल  सिड्स प्रा. लि.पाचोरा यांनी निर्मल संकरीत NRGH-726 दोडका या वाणा बद्दल संपूर्ण माहिती तसेच शेतकऱ्यांना याथोचीत असे अमुल्य मार्गदर्शन व निर्मल रायझामिका व बायोसंजीवनी व इतर निर्मल बायो प्रॉडक्ट बद्दल महिती दिली. 


यावेळी श्री. शहाजी कदम  व श्री. विजय किरमे यांच्या सं. दोडका NRGH-726 पिक पाहणी सर्व शेतकरी बंधूंनी पिक पाहणी केली.

  प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रमाचे अध्यक्ष केशरनंदन अॅग्रो बारडगाव दगडी संचालक श्री. महेश कदम साहेब ,श्री.नवनाथ गुळमे (प्रगतशील शेतकरी तथा दोडका उत्पादक ) व श्री. शहाजी कदम (प्रगतशील शेतकरी तथा चेअरमन दूध संघ)  निर्मल सिड्स च्या वतीने श्री आर. एस. दहातोंडे साहेब (RM अहमदनगर) यांनी शाल, गुलाब पुष्प, श्रीफळ व भेट वस्तु देऊन सत्कार केला.

  सदर कार्यक्रमानंतर मिष्ठान्न स्नेहभोजन करण्यात आलेया कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे व उपस्थित शेतकरी बंधू यांचे आभार श्री. किशोर गायकर साहेब ( J.Sr.) कर्जत यांनी मानले.