मित्रानो आज मा. पंत प्रधान यांनी चौदावा हप्ता शेतकऱ्यांचे खाते वरती जमा केला. आनंद आहे. पण शेतकऱ्याला आपल्या उपकाराची भीक कश्या साठी. त्याला का वाट पाहावी लागते चौदाव्या हप्त्याची. हे कधी जाणून घेणार आहोत का की नाही. आमचे सरकार शेतकऱ्यांना इतक्या रकमेची भीक देते. हे भासावता PM Kisan योजनेतून आम्हास काही तुटपुंजी रक्कम भिकाऱ्या प्रमाणे देण्यापेक्षा आम्ही पिकवत असलेला मालाची देशात असणारी वेगवेगळ्या पिकाची गरज. वेगवेगळ्या भागात त्याप्रमाणे उत्पादन करण्याचे नियोजन. कोणते अन्नधान्य किती पिकवले पाहीजे. त्याची देशात असणारी गरजेप्रमाणे मागणी. एक्सपोर्ट व इम्पोर्ट होणाऱ्या गोष्टीचे नियोजनात्मक प्लॅनिंग. विभागवार निसर्गाच्या पद्धतीने कोणती पिके कोठे घेतली तर ती फायदेशीर ठरतील याचा विचार करून. त्याचा उत्पादन खर्चावरती आधारित भाव व मार्केट वेवस्थापण करुन दिले तर तुम्ही मोठ्या अभिमानाने सांगत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या सबसिडी व pm Kisan योजनेची आम्हास गरज लागणार नाही. याची गरज आपल्या सर्व भ्रस्टाच्यारी यंत्रणेलाआहे. शेतकऱ्यांचे नाव घेऊन स्वतःची धन दांडग्यांची घरे भरण्याचा प्रकार चालवला आहे. आपल्या देशात GST इतर देश्यापेक्ष्या डबल टिबल घेउन शेतकऱ्याची लुट करुन त्यांना तुटपुंजी रक्कम मदत म्हणुन भीक म्हणून द्यायची त्याची फसवणूक करायची. प्रधानमंत्री आज युरियाचे उदाहरण देऊन दुसऱ्या देश्याची तुलना करुन शेतकऱ्यावरती किती मेहरबानी करतो हे बोलत होते. आपल्या देशात युरिया घ्यायचा असेल तर युरिया बरोबर लिंकिंग इतके मोठ्या प्रमाणात येते की एक गाडी युरिया घ्येणेसाठी 60000/- रुपये लागतात पण त्याबरोबर एक ते दीड लाखाचे दुसरे कोणतेतरी खत घ्यावे लागते. याबाबत कोणी बोलणार आहे का. दुसऱ्या देश्याशी तुलना करुन आपण युरिया कीती स्वस्त देतो असे सांगणारे पंतप्रधान आपण आम्हास शेतकऱ्यास बिंडोक समजता काय. मी आज दोन हजार सालापासून या खत विक्री वेवसायात आहे तेव्हा पासुन आपण सोडता कोणत्याही प्रधान मंत्र्यांनी आपला फोटो आमच्या दुकाना समोर लागला नाही आपण तो pmkisan योजनेच्या माध्यमातून लावला आपण येण्याअगोदर युरिया 200/- रुपयाचे आत व 50kg पॅकिंग मध्ये मिळत होता आत्ता 266/- रुपयाला 45 kg पॅकिंग मध्ये मिळत आहे.parle G फॉर्मुला वापरत तुम्ही 5kg कमी देत आहात.डीएपी,10: 26:26,SOP,MOP इतर NPK खते पाचशे रुपयांचे आत मिळत होती आता ती तेरासे ते अठराशे या दरात शेतकऱ्यास मिळतात SOP 700/- मिळत होते आता dcantrol केल्या मुळे 5000/- ला मिळते हे कोन सांगणार. आपण येण्या अगोदर या खताना ज्यास्त अनुदान मिळत होते पण pos मशीन ठेवून प्रत्येक पोत्याला शेतकऱ्याचा अंगठा घेऊन सर्व खताची पोती बदलून तुमचे फोटो लावने हा प्रकार कधी झाला न्हवता आम्ही आमच्या खिशातील पैसे घालून दुकाने उभारली आहेत त्यावर आपण आपला फोटो लाऊन 1.25लाख सेवा केंद्रे शेतकऱ्यास समर्पित असा दावा कसे करू शकता आम्हास प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून नोटिसा काढून आपले दुकानात शेतकऱ्यास बोलाऊन आपले भाषण ऐकायला कसे लावता. आज पंधरा दिवस झाले पाऊस सुरू आहे. तालुक्यात एक दोन ठिकाणे सोडली तर युरिया विकण्यास नाहि. आणि युरिया आलाच तर त्याबरोबर असणारे लिंकिंग पाहता युरिया खरेदी करू शकत नाही शेतकरी सर्व दुकाने पालथी घालत तालुकाभर फिरत आहे . या सर्व गोष्टींचा मी एक सुज्ञ नागरिक शेतकरी व वेवसायिक या नात्याने आपला निषेध व्यक्त करतो.

लेखक: अज्ञात