पायोनियर संकरीत बाजरी 86M38 या जातीच्या लागवडी करीता योग्य प्रकाराचे वातावरण

• पश्चिम घाट प्रदेश, संक्रमणविभाग-1, संक्रमणविभाग-2, अवर्षणप्रवण प्रदेश, निश्चित पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश, अति पावसाचा प्रदेश या शेती हवामान विभागात या वाणाची पेरणी करता येते. तसेच हालकी मध्यम ते भारी जमीन व मध्यम ते उच्च व्यवस्थापन 2 ते 3 पाणी देण्याची सुविधा असावी.

जमिनीची निवड आणि मशागत

हालक्या ते मध्यम व भारी जमिनीमध्ये हे पिक घेता येते जमिनीची मशागत: उन्हळयामध्ये जमिनीची खोल नागरणी करावी तसेच दोन वखरनी करुन जमिन समतोल करावी. भारी जमिनी करीता दोन वेळा नागरणी करावी. जमिनीचा सामु 6.2 ते 8 असावा. 5 टन शेनखत प्रति हेक्टरी पेरणीच्या 15 दिवस अगोदर जमिनीमध्ये टाकावे व वखरनी करुन मिसळून घ्यावे.

बिज प्रक्रिया पध्वत (किटक नाशक आणि बुरशी नाशक) 
या बियाण्यास मेटॅलॅक्झिलची बिज प्रक्रिया केलेली असते.

पेरणीची वेळ

खरीप 7 जून ते 15 जुलै

पेरणी पध्दत बियाण्याची एकरी मात्रा (दोन ओळी मधील अंतर व झाडामधील अंतर)

एकरी 1.5 किलो बियाण्याची पेरणी करावी.

पेरणी पध्दत बियाणे ओळ पध्दत तसेच टोचून पेरता येईल.

पेरणीचे अंतर - दोन ओळीतील अंतर 45 सेमी. असावे व दोन झाडातील अंतर 10 ते 15 सेमी. असावे. बियाण्याची खोली 2 ते 3 सेमी. असावी. 

रासायनिक खताची मात्रा, वापरण्याची पध्दत व वापरण्याची वेळ
तण नियंत्रण - रासायनिक तण नियंत्रके, वापरण्याची वेळ, वापरण्याची मात्रा.

चांगल्या उत्पादनाकरीता पेरणीपासून 30 दिवसापर्यंत पिक हे तण विरहीत ठेवावे. त्याकरीता पिकाची दोन वेळा कोळपणी करावी व पेरणी पासून 10 ते 15 दिवसानी पहिली निंदणी व दुसरी निंदणी पेरणी पासून 20 ते 25 दिवसानी करावी.

किड आणि रोग नियंत्रक - रासायनिक किटक नाशकाची /बुरशी नाशकाची मात्रा व योग्य वेळ

• जमिनीतील किडीच्या नियंत्रणा करीता

1) जमिनीमधून फोरेट 10 जी 5 ते 6 किलो प्रति एकरी देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
2) गोसावी रोगाच्या नियंत्रणा करीता :- बेनॅलॅक्झिल एम + मॅनकोझेब (फॅनटिक एम) तीन ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे पेरणीपासून 25 दिवसांनी फवारणी करावी. तसेच रोगट झाडे उपटून समुळ नष्ट करावी. तसेच जमिनीची खोल नांगरनी करुन जमिन साफ ठेवावी. 
3) पानावरचे ठिपके या रोगाच्या नियंत्रणा करीता :- पोलेरो 1 मिली/लिटर या दराने, देबार 1.5 ग्रॅम/ लिटर याप्रमाणे पेरणीपासून 25 दिवसांनी फवारणी करावी.

पाणी व्यवस्थापन

पाणी देण्याच्या मुख अवस्था खालील प्रमाणे आहे.

1) फुटव्याच्या अवस्थेमध्ये झाल्यावर

2) कणीस निघतांना व फुलोराच्या (परागीकरणाच्या) अवस्थेमध्ये गुडघ्यापर्यंतची उंची असतांना

3) दाणे भरण्याची अवस्था.

मुख्यत्वेकरुन, जास्त उत्पन्न प्राप्तीसाठी परागीकरणापासून दाणे भरेपर्यंत जमीनीत ओलावा असणे आवश्यक आहे. जर जमिन चांगल्या प्रतीची असेल तर हलके आणि निरंतर पाणी द्यावे. जमिनीच्या पोतानूसार 6 ते 10 दिवसांच्या अतरांने पाणी द्यावे. अति पाणी देणे टाळावे.

पिक काढणी पध्दत

दाण्याच्या खाली काळा रंगाचा टिपका आल्यानंतर पिक काढणीस योग्य झाले असे समजावे. 
दाण्याच्या बुडाशी काळा टिपका येण्या अगोदर पिकाची काढणी केल्यास उत्पन्नात घट येऊ शकते.

हाइब्रिडचे गुणधर्म

1) 86M38 ची कणसे, लांब व घट्ट असतात.

2) 86M38 चांगल्या व्यस्थापनामध्ये उच्च उत्पन्न देणारे वाण.

3) 86M38 चा चारा कापणीपर्यंत हिरवागार राहतो.

4) 86M38 च्या दाण्याचा रंग आकर्षक करडा आहे.

सरासरी उत्पन्न एकरी

• सरासरी उत्पन्न -

1) मध्यम ते उच्च व्यवस्थापनामध्ये 8 ते 10 किटंल / एकर

(उत्पन्न हे हवामान, व्यवस्थापन पध्दत, जमीनीचा प्रकार, खताची मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन व रोग किड व्यवस्थापन यावर आवलंबून असते.वरील दिलेले उत्पन्न हे कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलेल्या ट्रायलच्या आधारावर दिले आहे.)