कांदा रोपाचे मर रोगापासून करा संरक्षण

येत्या हंगामात सतत होणारी रिमझिम पाऊस किंवा ढगाळ वातावरण असल्यास व रोपवाटिकेत बुरशीमुळे मर रोग होतो. रोप वाढत असतानाही बुरशी जमिनीलगतचा भागातून शिरकाव करते. यामध्ये जमिनीलगतचा रोपांचा भाग मऊ पडतो आणि रोपे गळून जातात, सुकतात व पिवळी पडतात. त्यावर पांढरी बुरशी वाढते. बुरशी जमिनीत सुप्तावस्थेत अनेक वर्षे राहू शकते. या रोगामुळे रोपांचे न भरुन निघणारे नुकसान होते. शिवाय याकडे दुर्लक्ष केले तर याचा प्रादुर्बाव इतर रोपांवरही होतो.
 

रोगावर काय आहे उपाययोजना

  • कांद्याचे बियाणे निरोगी स्वच्छ व खात्रीचे असावे.
  • लागवडीपूर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
  • रोपाची लागवड करताना पाण्याचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होणारी जागा निवडावी.
  • रोपे गादीवाफ्यावर तयार करावे. कारण त्यावर पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो.
  • रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी.
  • रोप वाटीकेत  लुरीट १ ग्रॅम/ ली ची फवारणी करावी  तसेच  फॅंटीक-एम  २५० ग्रॅम आणि इकोलाईट २५० मिलि प्रती 10 गुंठे रानात आळवणी करावी .
  • रोप 25 दिवसाचे झाल्यास देबार १ ग्रॅम/ ली फवारणी करावी जेणे करून जमिनखालील व रोपावरील बुरशीचा नायनाट होईल.
  • ज्या दिवशी ढगाळ वातावरण व धुके पडण्याची शक्यता असेल त्या दिवशी पाण्यात विरघळणाऱ्या गंधक पावडरीची 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • धुक्याचा प्रभाव कमी करण्यासाठी दरवर्षी शेतात अल्प प्रमाणात वाळू मिसळा.
  • ढगाळ वातावरण व धुक्यापासून सर्वाधिक नुकसान नर्सरीत होते. संध्याकाळी रोपांच्या पानांवर पाण्याचा हलका फवारा मारावा.
अश्या प्रकारे तुम्ही रोपाटिकेतील कांदा रोपाचे संरक्षण करू शकता.