यावर्षी प्रचंड उत्सुकता असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सुप्रसिद्ध सोयाबीन वाण फुले दुर्वा (KDS-992) उत्पादन कसे आहे? शेतकऱ्यांनी लागवडी साठी प्राधान्य द्यावे की नाही या गोष्टी शेतकरी मित्रांनो या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. 


    अन्नद्रव्ये, कीड व रोग, तनांचे योग्य व्यवस्थापन आणि परिस्थिति अनुकूल असेल तर १३ ते १६ क्विंटल पर्यन्त या वाणाला उतार येऊ शकतो. सोयाबीन वाण फुले दुर्वा (KDS-992) महात्मा फुले कृषी विद्यापीठाने २०२० साली प्रसारित केलेला आहे. सोयाबीन वाण फुले दुर्वा (KDS-992) ची शिफारस दक्षिण भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांसाठी करण्यात आलेली आहे. 

वाणाची वैशिष्ठे: 

 • पिकाचा कालावधी:१०० ते १०५ दिवसात परिपक्व
 • तांबेरा या रोगास प्रतिकारक्षम 
 • पाने खणारी अळी साठी प्रतिकारक्षम 
 • उत्पादनक्षमता: ३० ते ३५ क्विंटल प्रति हेक्टर जमीन 
 • मध्यम ते भारी
 • उत्तम निचऱ्याची 

पूर्वमशागत 
 •     कमीत कमी दोन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी. 
 •     शेवटच्या वखरणीपुर्वी एकरी ५ टन शेणखत/ कंपोस्ट पसरवणे. 
 •     कुळवाच्या तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. 

पेरणीची वेळ:
 • १५ जून ते १५ जुलै
बियाणे: 
 • ६५ किलो प्रति हेक्टर
 • पेरणीपुर्वी प्रती किलो बियाण्याला ३ ग्रॅम अरेस्ट किंवा १.५ ग्रॅम मॅट्रिक्स ची बिजप्रक्रिया करावी. 
 • त्यानंतर प्रती १० किलो बियाण्याला रायझोबीयम २५० ग्रॅम + पीएसबी २५० ग्रॅम या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रिया करावी. 
पेरणीचे अंतर:
 • अति लवकर (९० दिवस पर्यन्त) व लवकर (९०-१०० दिवस) वाणाकरिता ३० x ७.५ सेमी किंवा ४५ x ५ सेमी 
 • उशिरा येणाऱ्या वाणासाठी (१००- ११० दिवस) ४५ x ७.५ सेमी
रासायनिक खते:
 • ३०:६०:३० किलो नत्र:स्फुरद:पालाश प्रती हेक्टर खतांची मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी. 
 • सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) द्वारे स्फुरद दिले नाही तर २० किलो गंधक प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे. 
 • शेंगा भरण्याच्या अवस्थेत १३:००:४५ ची ५ ग्रॅम प्रति लीटर पाण्यातून फवारणी करावी. 
अंतरमशागत 
 • पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी खुरपणी करावी. 
 • पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी कोळपणी करावी.
 • पीक उगवल्यानंतर २१ दिवसांनी तणनाशकाची फवारणी करावी. 

सोयबीन पिकातील अति महत्वाच्या टिप्स: 
 1. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी जास्त भाव मिळण्यासाठी सोयबीन डिसेंबर महिन्यात बाजारपेठेत विकावे. 
 2. सोयबीन+तूर ही आंतर पीक २:१ किंवा ४:२ प्रमाणात घ्यावे. 
 3. जिरायत कपाशीमद्धे सोयबीन अंतर पीक म्हणून १:१ किंवा २:१ (कापसाच्या दोन ओळी) या प्रमाणात घेता येइल. 
 4. ज्वारी पिकामद्धे सुद्धा सोयबीन अंतरपीक म्हणून घेता येते.
 5. जातीनुसार काढणीसाठी काढणी यंत्राचा वापर करावा.