महाराष्ट्रात बहुतांश नागरिकांचा पारंपरिक व्यवसाय शेती हाच आहे. परंतु राज्यात सर्वच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिति सुस्थित असतेच असे नाही. त्यामुळे शेतकरी शेतीसाठी बँक, वित्त संस्था तसेच सावकारांकडून जास्त व्याज दराने कर्ज घेतात व शेती करतात परंतु त्यातही दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ, पूर, अवकाळी पाऊस, नव-नवीन किडी व रोगांचा प्रकोप यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडू न शकल्यामुळे काही शेतकरी स्वतःचा जीवन प्रवास संपवण्याचा सुद्धा निर्णय घेतात. राज्यात पिकांच्या पेरणीची नोंदणी हि वहीत केली जाते त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्याला पिकाची नुकसान भरपाई मिळण्यास विलंब लागतो या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची माहिती मोबाइलवरील ॲपद्वारा गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा ई पीक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला.


ई पीक पाहणीचा उद्देश

 1. क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणी अहवालाचा Real Time Crop Data संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच, सदर Data संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक पेरणी अहवाल प्रक्रीयेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सादर Data वापरणे या उद्देशाने ई पीक पाहणी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
 2. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई चे दावे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या उद्देशाने ई पीक पाहणी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
 3. शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने ई पीक पाहणी अँप सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
    शासन निर्णयान्वये पिक पेरणीची माहिती मोबाइल अॅप द्वारा गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला आहे व त्यासाठी कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आली आहे. त्या अन्वये टाटा ट्रस्ट व महाराष्ट्र शासन यांच्यातील सामंजस्य करारान्वये टाटा ट्रस्टने हे अँप विकसित केले आहे. मागील काही दशकात तलाठी यांचेकडील वाढलेल्या कामाचा बोजा विचारात घेता, पिकांच्या नोंदी करण्यासाठी त्यांना आटोकाट परिश्रम करावे लागतात. तालाठयांच्या कामाचा बोजा कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल अँप च्या आधारे शेतकऱ्यांनी स्वतः पीक पेरणीची माहिती तलाठ्याकडे ऑनलाइन पाठविण्यासाठी ई पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात आला.

ई पीक पाहणी कार्यक्रमाची वैशिष्ट

 • महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल आणि कृषी विभागांनी संयुक्तरीत्या राज्यात ई पीक पाहणी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजना तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर पोहचविण्याचा दृष्टीने सुरु करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
 • पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनी वरील ॲप द्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा ई-पीक पाहणी हा कार्यक्रम टाटा ट्रस्ट ने विकसित केलेल्या आज्ञावलीचा वापर करून, त्यांच्या तांत्रिक व इतर अनुषंगिक बाबींच्या सहाय्याने व सहकार्याने दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण राज्यात राबविण्याची सुरवात करण्यात आली.
 • या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या विविध सुविधा आणि योजनांचा लाभ घेणे शक्य होईल.
 • ई पीक पाहणी कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणारी प्रक्रीया पारदर्शक असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला यात सहभागी करून घेण्याचे प्रशासनाचे स्वप्न पूर्ण होईल.

ई पीक पाहणी कार्यक्रमाचे लाभ

 • शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अंत्यत उपयुक्त ठरणार आहे.
 • राज्यभरामध्ये एकाच प्रकारच्या पीकासाठी एकच सांकेतांक क्रमांक निश्चित करण्यात येत असल्याने गाव/तालुका/जिल्हा/विभाग निहाय कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे. याची निश्चित आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे.
 • कृषी विभागाच्या विशिष्ट पिकासाठी देय असणाऱ्या योजना जसे ठिबक/तुषार सिंचन योजना इत्यादी चे लाभ खातेधारकांना अचूकरित्या देणे सहज शक्य होणार आहे.
 • आधार भूत किंमतीवर धान/कापूस/हरभरा व तूर खरेदी इत्यादी योजनांसाठी देखील पीक निहाय लागवडीचे क्षेत्र व उत्पन्नाचा अचूक अंदाज काढणे शक्य होणार आहे.
 • खातेनिहाय व पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होवू शकते. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांकडून किती रोजगार हमी योजना उपकर व किती शिक्षण कर देय ठरत आहे, हे निश्चित करता येते.
 • खातेदार निहाय पीक पाहणी मुळे खातेदार निहाय पीक कर्ज अथवा पीक विमा योजना भरणे किंवा पीक नुकसान भरपाई अदा करणे शक्य होणार आहे.
 • कृषी गणना अंत्यत सुलभ पध्दतीने व अचूकरित्या पुर्ण करता येईल.
 • पीक विमा आणि पीक विम्याचे दावे जलद गतीने निकाली काढणे, पीक कर्ज वाटप, अचूक नुकसान भरपाई आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास योग्य मदत यासाठी ई-पीक पाहणी कार्यक्रम लाभदायी आहे.
 • राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
 • राज्यातील शेतकरी डिजिटलीकरणा सोबत जोडला जाईल.
 • या कार्यक्रमांतर्गत पिकांची नोंदणी हि मोबाईल अँप च्या सहाय्याने करण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.

ई-पीक पाहणी ॲप चे फायदे

 • E Peek Pahani App मधील तलाठी स्तरावरील पिक पाहणी नोंदविताना मागील हंगामाची पीक पाहणी कायम ठेवण्याची सुविधा देण्यात आली आहे.
 • एका पेक्षा जास्त गट क्रमांक निवडून एकाच वेळेत नोंदविण्याची आणि एकाच प्रकारची कायम पड नोंदविताना  सुविधा देण्यात आली आहे.
 • ई-पीक पाहणी ॲपमध्ये केलेल्या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज मिळवणे शक्य होईल.
 • E Peek Pahani  नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीककर्ज Crop Loan मिळणे देखील सुलभ होणार आहे.
 • पीक विमा आणि पीक विम्याचे दावे निकाली काढणे, पीक कर्ज वाटप, अचूक नुकसान भरपाई आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास योग्य मदत यासाठी ई-पीक तपासणी नोंदी आवश्यक असतील
 • सुधारित मोबाईल अँपमध्ये शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करतांना राज्यातील प्रत्येक गटाच्या  (Centroid) मध्यबिंदूचे अक्षांस व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून प्रत्येक पिकाचा फोटो शेतकरी घेतील त्यावेळी फोटो घेण्याच्या ठिकाणापासून ते त्या गटाच्या मध्यबिंदू पर्यतचे ते अंतर यामध्ये  दिसणार आहे. व निवडलेल्या गटापासून शेतकरी पीक पाहणीसाठी  दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा (Messege ) संदेश त्यांच्या मोबाईल अँप मध्ये दर्शविण्यात येणार आहे. या प्रकारच्या नवीन सुविधेत पिकाचा अचूक फोटो हा घेतला जाणार आहे किंवा नाही हे यावरून निर्धारित करता येणार आहे.
 • ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मदत होईल. त्यामुळे राज्यातील आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे.
 • शेतकऱ्यांचे पीकविमा Crop Insurance आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
 • ई-पीक पाहणी ॲपमध्ये शेतकऱ्यांनी केलेली पिकांची नोंदणी स्वयंप्रमाणित मानण्यात येते. तसेच केवळ १० टक्के तपासणी तलाठ्यांमार्फत करण्यात येते.

ई-पीक पाहणी ॲप चे वैशिष्ट्ये

 • सुधारित मोबाईल अँपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या केंद्रबिंदूचे अक्षांश आणि रेखांश समाविष्ट आहेत, जेव्हा शेतकरी पीक पाहणीदरम्यान पिकाचा फोटो घेतो तेव्हा त्या ठिकाणापासूनचे अंतर त्या समुहाच्या मध्यभागी चित्र घेऊन जाण्याचे आदेश कमांडमध्ये दिसेल. जर शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असेल, तर त्याबाबतचा संदेश मोबाईल अँपवर दाखवला जाईल. या सुविधेमुळे ते शक्य होईल. पिकाचे अचूक छायाचित्रण केले गेले आहे की नाही हे निर्धारित केले आहे.
 • आतापर्यंत ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांची ॲपवर नोंदणी झाली आहे
 • ई पीक पाहणी अँपद्वारे शेतकऱ्यांनी नोंदवलेल्या पिकांबाबत, अध्यादेशामध्ये स्वयंघोषणा घेण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी केलेली ई-पीक तपासणी हे स्वयं-प्रमाणीकरण मानले जाईल आणि त्याचे प्रतिबिंब गावात दिसून येईल. नमुना क्रमांक 12. शेतकऱ्यांनी केलेल्या पिकाच्या 10 टक्के तपासणीची पडताळणी तलाठ्यामार्फत केली जाईल. पडताळणीनंतर तलाठी आवश्यक असल्यास दुरुस्त्यांसह नोंदींची पडताळणी करेल आणि नंतर गाव नमुना क्र. 12 मध्ये ते प्रतिबिंबित करेल.
 •  ई-पीकमध्ये मिश्र पिकातील घटक पिकांसाठी हंगाम, लागवड दिनांक निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे
 • मोबाईल अँपद्वारे शेतकऱ्यांनी नोंदविलेली पीक पाहणी हि नोंदविल्या वेळे पासून ४८ तासामध्ये शेतकऱ्यांनी  स्वत:हून केव्हाही एका वेळेस ती दुरुस्त करता येईल.
 • ई पीक पाहणी मोबाईल अँपद्वारे शेतकऱ्यांनी नोंदवलेली पीक तपासणी 48 तासांच्या आत केव्हाही स्वतः दुरुस्त करता येईल. किमान आधारभूत योजनेंतर्गत पिकाची ई-पीक तपासणीसाठी नोंदणी केली असल्यास, अशा शेतकऱ्याची माहिती वेब कमांडद्वारे पुरवठा विभागाला दिली जाईल आणि त्या आधारे अशा शेतकऱ्याची किमान आधारभूत किमतीत आपोआप नोंदणी केली जाईल. पुरवठा विभागाची योजना. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. या आधीच्या मोबाईल अँपमध्ये मुख्य पीक आणि दोन दुय्यम पिकांची नोंदणी करण्याच्या सुविधेऐवजी तीन दुय्यम पिकांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच दुय्यम पीक लागवडीची तारीख, हंगाम आणि क्षेत्र नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 •  गावामध्ये नोंदवलेली पीक पाहणीची माहिती गावातील सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध. (व्ह्यू ओन्ली स्वरूपात)
 • शेतकऱ्याला खरेदी केंद्रात रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता हि भासणार नाही.
 • E Pik Pahani Mobile App वापरताना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अँपमध्ये मदत बटण प्रदान केले आहे. त्यावर क्लिक करून, वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिली जातात. याचा वापर करून शेतकऱ्यांना अँप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवता येतील.
 • 3 वर्षांची ई पीक पाहणी माहिती नमुना नंबर १२ वर दिसणार तर पुढील ५ वर्षे संग्रहित ठेवली जाणार आहे
 • शेतकऱ्यांना वापरणे सोपे आणि सोयीचे व्हावे यासाठी महत्त्वाचे बदल करून ई-पीक पाहणी मोबाईल अँप विकसित करण्यात आले आहे

शेतकऱ्यांकडून पिकांचे स्वयं नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

 • नोंदणी प्रक्रियेसाठी स्मार्ट मोबाईल (Android) द्वारे गुगल प्ले स्टोर वरून ॲप डाऊनलोड करून स्थापित (Install) करावा.
 • खातेदाराने ई पीक पाहणी अँप मध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद करावी.
 • ७/१२ मधील नावाप्रमाणे खातेदाराने त्यांच्या नावाची अचूक पणे नोंदणी करावी.
 • ज्या खातेदाराचे एकाच महसुली गावात एका पेक्षा अधिक खाते क्रमांक आहेत,त्यांनी त्यांचे नाव नमूद केल्यास,त्या गावातील त्यांचे सर्व खाते क्रमांक व त्याखालील सर्व भूमापन/गट क्रमांक मोबाईल स्क्रीन वर नोंदणीसाठी उपलब्ध दिसतील.
 • शेतक-यांच्या नोंदणीकरिता त्यांचा खाते क्रमांक/भूमापन/गट क्रमांकाच्या माहितीसाठी संगणकीकृत ७/१२ किंवा ८ अ ची अद्ययावत प्रत सोबत ठेवावी.
 • सामायिक मालकीच्या जमिनीसाठी,ज्याचे नाव गाव न.नं.७/१२ मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदले आहे,ते सर्व सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.
 • अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक (अज्ञान पालक कर्ता)नोंदणी करू शकतील.
 • खातेदाराने पीक पाहणी ची माहिती शेतामध्ये उभे राहून करायची असून पीक पाहणी भरून झाल्यावर त्या पिकाचा अक्षांश रेखांशासह फोटो (GPS enabled ) व सर्व माहिती अपलोड करायची आहे. जर मोबाईल इंटरनेट सुविधेत अडचण येत असल्यास गावातील ज्या परिसरात इंटरनेट कनेक्शन मिळेल त्या ठिकाणी जावून पीक पाहणीची माहिती अपलोड करता येईल.
 • नोंदणीकृत मोबाईलवर आलेला चार अंकी संकेतांक (पासवर्ड) कायमस्वरूपी वैध राहून वापरता येईल.
 • एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचा स्मार्टफोन नसेल,तर सहजरीत्या उपलब्ध होणारा दुसरा स्मार्टफोन नोंदणीसाठी वापरू शकतात.
 • एका मोबाईल नंबरवरून एकूण २० खातेदारांची नोंदणी करता येईल.

ई पीक पाहणी प्रकल्पाच्या अटी

 • केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकरी ई पीक पाहणी प्रकल्पात सहभागी होऊ शकतात.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकरी ई पीक पाहणी प्रकल्पात सहभागी होऊ शकत नाहीत.
 • ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंदणी करण्यासाठी फक्त अँप चा वापर करण्यात येईल.

ई पीक पाहणी मोबाईल अँप अंतर्गत पीक नोंदणी करण्याची प्रक्रिया

 • शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मधील Play Store App यामध्ये जाऊन ई पीक पाहणी (E Peek Pahani) अँप सर्च करून ते डाउनलोड करायचे आहे.
E Pik Pahani App
 • अँप डाउनलोड झाल्यावर त्याला ओपन करायचे आहे आणि तुमचा महसूल विभागाची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
E Pik Pahani Mahsul Nivada
 • आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
 • आता तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, गाव याची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
E Pik Pahani Choose Area
 • आता तुम्हाला तुमचे पहिले नाव/मधले नाव/आडनाव/खाते क्रमांक/गट क्रमांक यांपैकी एखादी माहिती भरून शोधा बटनावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला खातेदाराची निवड करायची आहे.
E Pik Pahani Search Khatedar
 • आता तुम्हाला तुमचे खाते निवडून पुढे जायचे आहे.
 • आता तुम्हाला पीक पेरणी ची माहिती भरायची आहे.
E Peek Pahani Pik Perani Mahiti
 • आता तुम्हाला पिकांची निवड करायची आहे.
E Peek Pahani Pik Details
 • आता तुम्हाला पिकांसाठी सिंचन साधन आणि प्रकार निवडायचा आहे.
E Pik Pahani Sinchan Sadhan Prakalp
 • आता तुम्हाला तुमच्या पिकांचे फोटो अपलोड करायचे आहेत.
 • आता तुम्हाला तुमच्या पिकांचे अक्षांश रेखांश सहित उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड करायचे आहेत.
E Peek Pahani map photo
 • अशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी अंतर्गत पीक नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल

©Source: mrtba

Exploring the Convenience of the e-Pik Pahani App: Revolutionizing Land Records

In an age marked by technological advancement, traditional systems are being replaced by digital alternatives that bring efficiency, transparency, and convenience to various sectors. One such transformation can be witnessed in the domain of land records management with the introduction of the e-Pik Pahani app. This revolutionary application is changing the way land records are accessed, updated, and managed, significantly reducing bureaucracy and enhancing accessibility for millions.

Understanding Pahani and Its Importance

Pahani, also known as RTC (Record of Rights, Tenancy, and Crops), is a critical document in Indian agriculture that establishes ownership and legal rights over land. It includes details such as land ownership, cultivation rights, crop details, and more. Previously, obtaining and updating Pahani records involved cumbersome processes, long waiting times, and often, considerable bureaucracy. However, the advent of the e-Pik Pahani app has transformed this landscape.

The Birth of e-Pik Pahani App

The e-Pik Pahani app was born out of the necessity to simplify the land records management system in India. Recognizing the potential of technology to streamline processes and minimize errors, the government embarked on a mission to digitize land records. The result was the e-Pik Pahani app, which is designed to make land-related information accessible to farmers, landowners, and stakeholders with just a few taps on their smartphones.

Key Features and Benefits

1. Online Access to Land Records: One of the most significant advantages of the e-Pik Pahani app is that it offers users easy access to their land records. Gone are the days of waiting in long lines or dealing with bureaucratic red tape. Users can retrieve their Pahani details online, providing them with quick and hassle-free access to critical information.

2. Transparency and Accuracy: The app aims to eliminate discrepancies and ensure transparency in land records. By digitizing the process, the likelihood of errors, manipulation, and fraudulent activities is greatly reduced, instilling trust in the land records system.

3. Instant Updates: Traditional methods of updating land records required multiple visits and lengthy processes. With the e-Pik Pahani app, users can update their records almost instantly. This is particularly beneficial for crop details and changes in ownership, ensuring that records are up-to-date at all times.

4. Reduced Paperwork: The app's digital approach significantly reduces paperwork, contributing to environmental conservation. This not only aligns with global sustainability efforts but also simplifies the administrative burden on both users and government officials.

5. Mobile Convenience: The app is designed to be user-friendly and accessible via smartphones. This level of convenience is particularly valuable for farmers and rural residents who may not have easy access to desktop computers or traditional government offices.

Challenges and Future Prospects

While the e-Pik Pahani app offers numerous benefits, its adoption and success are contingent on factors like digital literacy, network connectivity, and awareness. Efforts must be made to ensure that users in remote areas can also leverage the app effectively. Moreover, periodic updates and improvements are essential to address any technical glitches and enhance user experience continually.

The e-Pik Pahani app exemplifies the transformational power of technology in reforming traditional systems. By bringing land records into the digital realm, the app is contributing to increased transparency, reduced bureaucracy, and enhanced accessibility for all stakeholders. As India marches forward into a digital future, such initiatives underscore the nation's commitment to progress and innovation, ultimately benefiting millions of farmers and landowners across the country.