विकसित देशातील कृषि नियोजनाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे कृषि उत्पादन वाढून कृषि उत्पन्न वाढून देशाच्या सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी कृषि मालाची परिणामकारक कृषि विपणन व्यवस्था होणे अत्यंत जरूरी आहे. उत्पादन आणि वाढत्या बाजारभावांची शेतकन्याला माहित असल्यास त्याद्वारे शेतकऱ्याला निश्चित जास्त शकतात. नव्या जागतीक बाजारपेठामधील संधीचा लाभ शेतकरी वर्गाला व्हावा, याकरिता राष्ट्रीय बाजार विपणन व्यवस्था पारदर्शी, एकात्मिक व सर्व शेतकऱ्यांपर्यंत तात्काळ पोहोचण्याकरिता सुदृढ बनविणे आवश्यक आहे. आजची विपणन व्यवस्था ही माहिती तंत्रज्ञानाच्या जाळ्यावर उभी आहे. उदा. ग्राहकांना नेमके काय हवे आहे किती किंमतीत हवे आहे आणि या किंमतीत त्यांना कोण उत्पादक पुरवठा करू शकणार आहेत. माहिती व तंत्रज्ञानामुळे ग्रामीण शेतकऱ्यांसमोर लक्षणीय संधी उपलब्ध झाल्या आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे कृषि विपणन मिळत असून त्यामुळे डाटाबेस आवश्यक माहिती शेतकऱ्यांना मागणी व त्याची उपलब्धता, उत्पादित मालाची पॅकिंग इत्यादी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे. कृषि व्यवसाय करण्यासाठी तसेच कृषिमाल बाजाराच्या प्रसार करण्यासाठी खालील माहिती तंत्रज्ञानाची साधने वापरली जातात. 

१. मार्कनेट :


मार्कनेट म्हणजे महाराष्ट्रातील कृषिमाल बाजाराच्या चातुर्याबद्दलचे असलेले जाळे (Agriculture Marketing Intelligence Network) महाराष्ट्र राज्य कृषि विपणन मंडळ (एम.एस.ओ.एम.बी.) यांनी म्हणून महाराष्ट्रातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जाळ्याची स्थापना केली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात कृषि उत्पन्न बाजार समित्या इंटरनेटद्वारे संगणकाने जोडल्या गेल्या आहेत. याद्वारे कृषि विपणनातील माहितीची देवघेव केली जाऊ शकते. तसेच कृषि विपणनाशी आधारित एकुण ५२ कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये माहितीचे प्रसारण केले जाते. मार्कनेट सुरु करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकन्यासाठी दरारेजच्या मालाची आवक व किंमत यांची माहिती प्रसारित करणे तसेच कृषिमालाला रास्त भाव मिळण्यासाठी कृषिमाल कोठे व केव्हा विकावा हा होय. याच महाराष्ट्रात मार्कनेटचे एकूण २०० नोडस (संगणक) कार्यरत आहेत.

२. अॅगमार्कनेट :


डायरेक्टोरेट ऑफ मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन (डी.एम.आय.) कृषि मंत्रालय, भारत सरकार यांनी राष्ट्रीय विज्ञान केंद्र (एन.आय.सी.) दिल्ली यांच्यामार्फत अंगमार्कनेट (अॅग्रीकल्चरल मार्केटिंग रिसर्च अॅण्ड इन्फर्मेशन ही योजना राबविली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यातील अंतर्गत कामकाजात सुसूत्रता य पारदर्शकता आणणे तसेच सर्व बाजार समित्यांचे एकत्रित, राज्य कृषि पणन मंडळ, संचालनालय देशभरातील कृषि विपणनाची प्रादेशिक कार्यालये व शेतकरी यांना उपलब्ध करून देणे हा आहे. सद्यस्थितीत अॅगमार्कनेट हा प्रकल्प ७३५ कृषि उत्पनन्न बाजार समित्या तसेच राज्य कृषि विपन मंडळे राबवत असून पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस आणखी सुमारे २०००- बाजारपेठामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येईल. राज्य पणन मंडळातर्फे महाराष्ट्र राज्यात पाच टप्प्यात सर्व २९१ मुख्य कृषि बाजार समित्यांचे संगणकीकरण पूर्ण झाले शिवाय ५४ उपबाजारांचेही संगणकीकरण करण्यात आले आहे. पणन मंडळाच्या या www.msamb.com स्थळावर एकूण ३४५ बाजार समित्यातील सर्व शेतमालांचे दैनंदिन बाजारभाव व आवक यामुळे कृत्रिमरित्या झाली आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बाजार विषयक (बाजारभाव, मागणी, उपलब्धता इ.) माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना आपला उत्पादित माल देशांतर्गत कोठेही विकता येत असल्याने या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना निश्चित स्वरूपात जास्त पैसे मिळू शकतात.

३. इ-कॉमर्स


दोन ते तीन संस्थामध्ये संगणकामार्फत व्यवसायाच्या व्यवहार प्रक्रियेला इ-कॉमर्स म्हणतात, सद्यस्थितीत भारतामध्ये कृषि क्षेत्रात इ-कॉमर्स मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत नाही. तरीपण इ-कॉमर्समार्फत कृषि निविष्ठ आणि कृषि उत्पादनाच्या व्यवहारासाठी सध्या बराचसा वाव आहे. तनराज आणि बोस (सन २००२) यांच्या अमेरिकेमधील पेरू देशाच्या खेड्यातील शेतकऱ्यांनी इ-कॉमर्समार्फत अमेरिका येथे शेतमाल विकल्याने त्या शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच पटीने जास्त मिळाल्याचे आढळून आले.

वायदे बाजार म्हणजे भविष्यातील खरेदी विक्रीचा व्यवहार होय. वायदे बाजार हा भविष्यातील किंमती संशोधित करणारा सर्वात कार्यक्षम बाजार आहे, कारण या बाजारात भाग घेणारे दलाल हे अद्ययावत किंमत संवेदनशिल माहितीच्या आधारे व्यवहार करतात. ज्या बाजारामध्ये वस्तूंच्या खरेदी विक्रीचा व्यवहार वर्तमान काळात म्हणजे चालू तारखेला ठरतो, पण त्या वस्तुचा प्रत्यक्ष देणे गेणे व्यवहार भविष्यकाळात ठरविलेल्या निश्चित तारखेला करायचा असतो, त्याला वायदे बाजार असे म्हणतात. वायदे बाजार किंवा अग्रीम किंवा आगाऊ बाजार यामध्ये सर्वसाधारणपणे वस्तूंची प्रत्यक्ष देवाण-घेवाण होत नाही, तर खरेदीदार आणि विक्रेता यांच्या दरम्यान या व्यवहारातील फायदा अगर तोटा होणाऱ्या रकमेची देवाण-घेवाण होत असते.

शेतमालाच्या किंमतीत होणाऱ्या अप्रमाणित व हानीकारक व्यापारावर नियंत्रण राखण्यासाठी केंद्र सरकारने फॉर्बर्ड कॉन्ट्रॅक्स (रेग्युलेशन) अॅक्ट १९५२ हा कायदा केला. या कायद्याचा मुख्य हेतू वायदे बाजारामध्ये चालणान्या देण्याघेण्याच्या व्यवहारावर नियंत्रण राखणे, वस्तूंच्या जुगारी स्वरूपातील करारावर बंदी घालणे आणि वायदे बाजाराशी संबंधित इतर निर्णय घेणे हा आहे. ही कामे वायदे बाजार आयोगाच्या सहकार्याने केली जातात. या कायद्यातील कलमांच्या आधारे वेळोवेळी वस्तूंच्या किंमतीमध्ये दिसणाऱ्या सुट्यांच्या प्रवृत्तीवर लक्ष ठेवून सरकार निरनिराळ्या वस्तूंच्या वायदे बाजारावर निर्बंध घालत असते.

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीपासून वस्तूंचा वायदे बाजार प्रचलित आहे. सर्वात प्रथम कापसासाठी मुंबई येथे सन १८८५ साली वायदे बाजार स्थापन करण्यात आला. गळित धान्यासाठी मुंबईतच सन १९०० साली, तागासाठी कलकत्ता येथे सन १९१२ साली तर हापूर येथे सन १९१३ साली गव्हाच्या वायदे बाजाराची निर्मिती करण्यात आली.
वायदे बाजाराची संकल्पना डिसेंबर २००३ पासून सुरु झालेली असून त्यात तीन लाख कोटी रुपयांची संकल्पना शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच शेती व्यवसायासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण आज इतर बाजारपेठेत शेतमालाचे भाव कधीही शेतकऱ्यांना सांगितले जात नाहीत किंवा त्यांच्यासमोर मांडले जात नाही. आजही शेतमालाचे भाव ठरविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य व्यापाऱ्यांनाच आहे आणि अनेकदा कोणत्या भावाने शेतमाल विकला हे शेतकन्याला त्याच्या हातात पट्टी पडल्यानंतरच समजते. ही फारच दुर्दैवी बाब आहे.

वायदेबाजारामुळे शेतकरी आपल्या कृषि हवामान विभागानुसार विविध पिके/ पीक पद्धती आणि उत्पादन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जास्त नफा मिळवू शकतात, तसेच शेतीचे उत्पादन मिळाल्यानंतर गोडाऊन मध्ये. साठवणूक, निघालेल्या उत्पादनावर कर्ज आणि विमा यासारख्या सोयी वापरून योग्य वेळी योग्य किंमतीत शेतमाल विकू शकतो. बहूतेक भारतीय शेतकरी हे छोटे आणि सम सिमांत प्रकारचे असल्यामुळे भविष्यातील किंमतीची अद्ययावत माहिती घेऊन त्यांना आपली पीक पद्धती ठरविता येते आणि त्यानुसार गुंतवणूक विषयक निर्णय घेण्यास त्यांना मदत होवू शकते. जागतिक बाजारपेठेत आयात निर्यातीचा प्रवाह योग्य प्रमाणात ठेवण्यातही वायदे बाजाराचा मोलाचा वाटा आहे. यामुळे शेतमालाची निर्यात जागतिक बाजारपेठेत वाढू शकते. या सर्व बाबींचा शेती विकासाच्या दृष्टीने विचार केला तर दीर्घकालीन उपाय म्हणून वायदे बाजार ही संकल्पना फारच उपयुक्त आहे. वायदे बाजाराची वैशिष्ट्ये.

बायदे बाजारात एकाच वेळी आजची किंमत काय आहे आणि भविष्यातील किंमत काय असेल याची माहिती होते.. मात्र ही भविष्यातील किंमत अंदाजे नसते तर त्या किंमतीवर आपण प्रत्यक्ष खरेदी विक्री करू शकतो. सद्यस्थितीत हजर

बाजारात (स्पॉट मार्केट) आधी माल मग सौदा तर वायदे बाजरात आधी सौदा मग माल.