फ्युजन

एमामॅक्टिन बेंझोएट ५% एस.जी.


कीटकनाशक

एमामेक्टीन बेंझोएट ५% एस. जी. पाण्यात विरघळणारे सूत्रीकरण आहे. ह्यात ५% सक्रिय घटक उपलब्ध आहे. याचा उपयोग कपाशीवरील बोंड अळी व भेंडीवरील खोड व फळ पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी केला जातो. हे कीटकनाशक आळीच्या पोटात गेल्यावर त्याचा परिणाम दाखवते आणि चांगल्या नियंत्रणासाठी हे अळ्यांनी खाणं आवश्यक आहे. एमामेक्टीन बेंझोएटचा संपर्क झाल्यानंतर अळ्या लकवाग्रस्त होतात व खाद्य घेणं बंद करतात त्यामुळे २-४ दिवसांत त्या मरून जातात.पीक उपयोग:

भेंडी
खोड आणि फळ पोखरणारी अळी 
डोस: १०० ग्रॅम प्रति एकर 
कापूस

बोंड अळी
डोस: १०० ग्रॅम प्रति एकर 
वापरासाठी निर्देश: 

 • जेव्हा अळ्या पहिल्यांदा दृष्टीस पडतील, तेव्हा निर्देशानुसार या कीटकनाशकाची फवारणी करा. 
 • गरज वाटल्यास पुन्हा फवारणी करा. 
 • कीटकनाशक दिलेल्या मात्रेनुसार पाण्यात मिसळून योग्य प्रकारे फवारणी करा.

खबरदारी : 

 • फवारणीचे मिश्रण बनविण्यासाठी स्वयपाकाची भांडी वापरू नका. 
 • फवारणीचे मिश्रण बनविण्यासाठी काठीचा वापर करा. 
 • त्वचेशी संपर्क टाळण्यासाठी हातमोजे वापरा. 
 • श्वासाने हुंगणे व डोळ्यांना लागू देणे टाळा. 
 • फवारणी करताना मुखवटा, गॉगल्स, बुट या सारखे संरक्षक कपडे वापरा व फवारणीच्या तुषारांना संपर्कात येऊ देऊ नका. 
 • उत्पादन हाताळताना किंवा वापरताना खाऊ पिऊ किंवा धूम्रपान करू नका. 
 • न वापरलेलं मिश्रण साठवून ठेवू नका. 
 • स्प्रेयर, बादल्या आणि इतर भांडी दररोज वापरानंतर धुवा. 
 • हात व साबण भरपूर पाण्याने धुवा आणि काम संपल्यावर कपडे बदला, खराब झालेले कपडे देखील धुवा. 
 • नाले, डबकी इ. मध्ये राहिलेले साहित्य टाकुन किंवा स्पेयर्स वापरलेल्या बादल्या इ. धुवून दुषित करू नका. 

विषबाधेची लक्षणे:

या कीटकनाशकाशी संपर्क झाल्यास दिसणारे प्रारंभिक लक्षणे आहेत: डोळ्यांच्या बाहुल्या पसरणे, असंतुलन, एटाक्सिया, अडखळणे व मांसपेशी धरथरणे.

प्रथमोपचार: 

 • पोटात गेल्यास जर श्वसनात गेल्यास रोग्याला मोकळ्या हवेत न्या. 
 • त्वरीत डॉक्टराना बोलवा, त्वचेशी संपर्क झाल्यास खराब झालेले कपड़े उत्तरवा व संपर्कात आलेली त्वचा साबण व पाण्याने काळजीपूर्वक धुवा. 
 • डोळ्यातून संपर्क झाल्यास पर्याप्त पाण्यात धुवा. 
 • गिळले गेल्यास पाण्यात मेडिसिनल चारकोल घालून पाजावे. 
 • बेशुद्ध रोग्यास तोंडावाटे काहीही देऊ नये. 
 • उलट्या करवु नये.

निवारक उपाय : 

लक्षणानुसार आणि मदत होईल असा उपचार करा.  


साठवण:


1. कीटकनाशक असणारी पॅकेजिस, इतर माल विशेषतः खाद्यपदार्थ साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खोल्या, जागा यापासून दूरच्या खोल्यात, जागेत साठवण करून ठेवावीत. किंवा त्यांचे प्रमाण आणि स्वरूप लक्षात घेऊन वेगळ्या कपाटातही कडीकुलपात ठेवावीत.

2. कीटकनाशकाच्या साठवणी करता असलेल्या खोल्या, जागा चांगल्या उजेडाच्या चांगल्या बांधलेल्या, कोरड्या, थंड हवा खेळती राहाणाऱ्या आणि पुरेशा क्षेत्रफळाच्या असाव्यात.


डबे खोक्यांची विल्हेवाट


1. पॅकेजिस किंवा जादा उरलेले द्रावण तसेच साधनसाहित्य आणि डबे यांची विल्हेवाट सुरक्षित प्रकारे आणि पर्यावरण किंवा पाणी प्रदूषित होणार नाही याची काळजी घेऊन करावी.

2. रिकामी पॅकेजिस फाडून तोडून, वस्तीपासून दूर जागी पुरून टाकावीत.

3. वापरून रिकामी झालेली पॅकेजिस पुनः वापरली जाऊ नयेत म्हणून उघड्यावर ठेवू नयेत.


सावधान: 

या लेबल/माहिती पत्रकावर निर्देश केलेल्या पीकांव्यतिरिक्त अन्य पीकांवर उपयोग करू नये.